जायकवाडीसाठी गंगापूर धरणाच्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी

November 6, 2015 3:24 PM0 commentsViews:

gangapur_dam406 नोव्हेंबर : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रवाहित झालेलं हे पाणी आता नाशिक शहरातील गोदावरीच्या पात्रातून जातंय. यावरुन आंदोलनं, राजकारण सुरू असलं तरी पावसाळा नसतानाही नदीला पूर आलाय असं चित्र दिसतंय.

कुंभमेळ्यानंतर पुन्हा एकदा गोदावरी नदी दुथडी भरुन वाहतेय. सप्टेंबर महिन्यात तीनही शाही पर्वण्यांना गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं.

वैष्णवांच्या शाही स्नानानंतर आता हे तहानलेल्या मराठवाड्यासाठी सोडण्यांत आलंय. नांदूरमाध्यमेश्वर, दारणा सांगवी आणि प्रवरा मार्गे हे पाणी सलग 8 दिवस प्रवास करुन जायकवाडीला पोहोचेल. या पाण्यानं शहरातील रामकुंडाचा भाग पूर्ण जलमय झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close