प्रांतवाद रोखण्यासाठी कायदा बदलावा

February 7, 2010 12:24 PM0 commentsViews: 5

7 फेब्रुवारीप्रांतवाद रोखण्यासाठी कायदे अपुरे आहेत, त्यामुळे या कायद्यात बदल करावा अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या अंतर्गत सुरेक्षबद्दलच्या बैठकीत चव्हाण यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात मराठी-अमराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेने जोरदार वातावरण तापवले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. याच बैठकीत दहशतवाद आणि नक्षलवादाप्रमाणेच प्रांतवादाचे राजकारण करणार्‍या लोकांचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे, अशी टीका शिवसेना, मनसेचे नाव न घेता पंतप्रधानांनी केली आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद रोखण्यासाठी राज्यांची पुरेशी तयारी नसल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना फटकारले आहे. तर सुरक्षा व्यवस्थेच्या आधुनिकीकरणात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मागे असल्याचेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांची मात्र फॉरेन्सिक क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांसाठी गृहमंत्रालयाने प्रशंसा केली आहे.

close