केडीएमसीसाठी सेना-भाजपची युती पक्की ?

November 6, 2015 9:32 PM0 commentsViews:

sena bjp kdmc06 नोव्हेंबर : कल्याण-डोंबिवलीसाठी शिवसेना आणि भाजपची युती पक्की झालेली आहे. काही वेळापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेच्या सुभाष देसाई यांनी यासंदर्भातली घोषणा केली. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि सेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक होणार असून युतीचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. आज रात्री महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठीही चर्चा होणार आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनसाठी शिवसेनेला बहुमताने हुलकावणी दिली. सेनेनं 52 जागा पटकावल्या तर भाजपने 42 जागा जिंकल्या आहे. बहुमतासाठी 61 जागेचा जादुई आकडा गाठण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीच्या आधी दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवत एकमेकांवर एकही टीका करण्याची संधी सोडली नाही. एवढंच नाहीतर सेनेनं तर युती तोडण्याचा इशारा दिला होता. आता मात्र सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close