युतीचं राजकारण त्यांना लखलाभ, पाठिंबा देणार नाही -राज

November 6, 2015 11:15 PM0 commentsViews:

raj thackaey pc06 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहे. तर दुसरीकडे किंगमेकर भूमिका बजावू शकणार्‍या मनसेनं आपलं ‘इंजिन’ स्पर्धेतून बाहेर काढलंय. मनसेचा कुणालाही पाठिंबा नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतलाय. त्यामुळे मनसे कुणाला पाठिंबा देणार नाही हे आता स्पष्ट झालंय.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक 52 जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ भाजपने 42 जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले. पण बहुमत दोन्ही पक्षांना गाठता आले नाही. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढले. प्रचारादरम्यान एकमेकांवर एकही टीका करण्याची संधी सोडली नाही. तर दुसरीकडे मनसेचं इंजिनही घसरलं. पण तरीही मनसेनं मिळवलेल्या 9 जागांच्या बळावर किंगमेकरची भूमिका बजावू शकते अशी शक्यता निर्माण झाली. बहुमतासाठी मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनसे शिवसेनेला टाळी देते का हे आतापर्यंत गुलदसत्यात होतं. पण, आज राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देत ‘टाळी’वर पडदा टाकलाय. त्यांचं काहीही राजकारण असो आपण त्यात पडणार नाही. त्यांचं राजकारण त्याना लखलाभ असो. मनसे कुणालाही पाठिंबा देणार नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा करत का हे पाहण्याचं ठरणार आहे.

दरम्यान, उद्या सकाळी महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुल दामले ह्याचं पुढे तर सेने कडून रमेश म्हात्रे आणि दिपेश म्हात्रे ह्याचं नाव चर्चेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close