वर्चस्व दक्षिण आफ्रिकचे

February 7, 2010 1:02 PM0 commentsViews:

5 फेब्रुवारीनागपूर टेस्टच्या पहिल्या दिवसावर दक्षिण आफ्रिकचे वर्चस्व राहिले आहे. टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने 2 विकेटस्‌वर 291 रन्स अशी भक्कम मजल मारली आहे. जॅक कॅलिस आणि हशिम अमला यांच्या नॉटआऊट सेंच्युरी हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. टॉस जिंकून आफ्रिकन कॅप्टन ग्रॅम स्मिथने पहिली बॅटिंग घेतल्यावर झहीर खानने आफ्रिकन टीमला दोन लागोपाठ धक्के दिले. आधी ऍशवेल प्रिन्स आणि मग ग्रॅम स्मिथला त्याने आऊट केले. त्यानंतर मात्र जॅक कॅलिस आणि हशिम अमलाने खेळाची सूत्रं आपल्या हातात घेतली. तिसर्‍या विकेटसाठी दोघांनी आतापर्यंत नॉटआऊट 285 रन्सची पार्टनरशिप केली आहे. कॅलिसने आपली 34वी टेस्ट सेंच्युरी ठोकली आणि दिवसअखेर तो 159 रन्सवर नॉटआऊट आहे. तर अमलानेही आठवी सेंच्युरी पूर्ण केली आहे. आफ्रिकन टीमचा उद्या प्रयत्न असेल तो मोठा स्कोअर उभा करण्याचा.

close