मसाणजोगी समाजानं जातपंचायतीला दिली मुठमाती

November 7, 2015 3:03 PM0 commentsViews:

ahamad_nagar_jaat07 नोव्हेंबर : मसाणजोगी समाजा आता समाज मुख्य प्रवाहात येणार आहे. अहमदनगरमध्ये मसाणजोगी समाजानं जातपंचायतीला मुठमाती दिलीय. समाजाच्या बैठकीत जातपंचायती बरखास्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय.

समाजात सध्या अनेक पारंपरिक रुढी, अंधश्रद्धा, अज्ञन, वाळीत टाकण्याच्या प्रथा रुढ होत्या. त्यामुळं अनेक वादविवाद- तंटा पंचायतीच्या माध्यमातून सोडवले जात होते. मात्र त्यामुळं अन्यायच पदरी पडत काही वेळा अघोरी शिक्षासह वाळीत टाकलं जात होतं. त्यामुळं समाजातील काही वरिष्ठांनी एकत्र येत जातपंचायतला मुठमाती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बैठकीत सर्वानुमते जातपंचायत बरखास्तीचा ठराव केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close