राष्ट्रवादीकडून गिरीष बापटांना ड्रायफूटऐवजी ‘डाळफूट’ची दिवाळी भेट

November 7, 2015 5:55 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर : राज्य सरकारने 100 किलोने तूरडाळ मिळेल अशी गर्जना केली खरी पण सपशेल ती फोल ठरलीये. त्यामुळेच आज पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीष बापट यांना ड्रायफूटच्या ऐवजी ‘डाळफूट’चा बॉक्सच गिफ्ट दिलाय. या अनोख्या गिफ्टमुळे गिरीष बापटही अवाक् झाले. पण मीडियाच्या कॅमेर्‍यासमोर मात्र त्यांनी मोठ्या मनाने हा गिफ्ट बॉक्स स्वीकारला.ncp_gift_bapat

अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दोन दिवसांपूर्वी उद्यापासून 100 रुपये किलोने दाळ मिळेल अशी घोषणा केली होती. पण दोन दिवस उलटले तरी बाजारात 100 रुपये किलोनं डाळ मिळत नाहीये. पुण्याचे पालकमंत्री असलेले गिरीष बापट यांच्या पुण्यातच 100 किलोनं डाळ मिळत नाहीये. त्यामुळेच आज राष्ट्रवादीचे नेते आणि पुण्याचे महापौर दत्त धनकवडे आणि प्रवक्ते अंकुश काकड़े यांनी गिरीष बापट यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन डाळीचा गिफ्ट बॉक्स दिला. बापट यांना अचानक आलेल्या या गिफ्टमुळे स्वीकारावा की नाही या पेचात सापडले. पण खेळीखेळमेळी च्या वातावरणात बापट यांनी गिफ्ट बॉक्स स्वीकारला.

गिरीष बापट हे पुण्याचे असून त्यांच्याकडे महत्वाचं खातं मिळालं. ते कोणत्याही पक्षाचे असो पण बापट हे मोठे मंत्री झाले. ते अभ्यासू असून जनतेच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही त्यांना हा गिफ्ट बॉक्स देतोय असा टोला काकडे यांनी  लगावला.

बापट यांनीही काकडेंचा टोला टोलावून लावला. राष्ट्रवादीवर असं गिफ्ट देण्याची वेळ आली. मुळात दिवाळीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडे पैसे नाहीत हाच मोठा विनोद आहे असा टोला बापट यांनी लगावला. परंतु, सरकारच्या पातळीवर सर्व प्रयत्न सुरू असून दिवाळीपूर्वी डाळ स्वस्त मिळेलच असं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनानंतर मुंबईतही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी डाळ बॉक्स भेट देण्यास सुरुवात केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close