पाणीटंचाईचा फटका वीज निमिर्तीला

February 7, 2010 1:25 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीराज्यात एकीकडे पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक गांवामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. तर दुसरीकडे या टंचाईचा फटका आता वीज निर्मितीलाही बसणार आहे. पाणीटंचाईमुळे विदर्भातील अनेक वीज निर्मिती केंद्रांमधील वीजनिर्मिती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. टंचाईचा सर्वात अधिक फटका चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनला बसणार आहे. येथील 700 मेगावॅट वीज निर्मिती युनिटस् बंद करण्याचा विचार वीजनिमिर्ती कंपनी करत आहे. कारण वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणा-या इरई धरणाची पातळी घटली आहे. राज्यातील सर्वात अधिक थर्मल पॉवर प्रोजेक्टस् विदर्भात आहेत. यंदा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळेच वीजनिर्मिती कंपन्या चिंतेत आहेत. साहजिकच वीजनिर्मिती थांबल्यास ऐन उन्हाळ्यात राज्याला मोठ्या लोडशेडिंगला तोंड द्यावे लागणार आहे.

close