झालं युतीचं ‘कल्याण’, 4 वर्षं सेनेचा महापौर

November 7, 2015 10:43 PM0 commentsViews:

kdmc_sena_bjp407 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेसाठी एकमेकांविरोधात उभे ठाकलेले सत्ताधारी आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले आहेत. केडीएमसीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केडीएमसीमध्ये युती झाल्याचं जाहीर केलंय. या युतीसाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय. पहिले अडीच वर्षे सेनेचा महापौर असणार आहे त्यानंतर एक वर्ष भाजपकडे तर उर्वरीत दीड वर्षे सेनेकडे महापौरपद असणार आहे.

कल्याण डोंबिवलीच्या आखाड्यात भाजप आणि शिवसेना असा सामना रंगला होता. सेनेनं तर सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एवढंच नाहीतर सेना -भाजपमधला राडा पोलीस स्टेशनपर्यंत गेला. पण, निकालाअंती शिवसेनाच मोठा भाऊ ठरला. तर भाजपला लहान भाऊ. सेनेनं 52 जागा जिंकल्यात आणि भाजपने 42 जागा पटकावल्यात. पण बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारी सुरू केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये ही चर्चा झाली. अखेर आज अपेक्षेप्रमाणे युतीवर शिक्कामोर्तब झालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केडीएमसीमध्ये युती झाल्याचं जाहीर केलंय. महापौरपद शिवसेनेकडे 4 वर्षं असणार आहे तर 1 वर्ष भाजपकडे असणार आहे. तसंच स्थायी समितीचे अध्यक्षपद दोन वर्षे भाजपकडे, दोन वर्षे शिवसेनेकडे असणार आहे. त्यानंतर उर्वरीत एक वर्षे कुणाकडे पद असावे यासाठी युतीचे नेते एकत्र बसून निर्णय करणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं. केडीएमसीच्या जनतेचा कौल आम्हाला मान्य असून जनतेच्या हितासाठी युती करत असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलंय.

असं झालं सत्तेसाठी वाटप

पहिली अडीच वर्षं शिवसेनेचा महापौर
त्यानंतर एक वर्ष महापौरपद भाजपकडे
शेवटची अडीच वर्षं सेनेचा महापौर
स्थायी समिती- दोन वर्षे भाजपकडे, दोन वर्षे शिवसेनेकडे
उर्वरीत एक वर्षे- युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close