पवार ‘मातोश्री’वर..!

February 7, 2010 2:09 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री' पोहोचले आहेत. औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर पवार मुंबईत आले. आणि विमानतळावरून ते थेट 'मातोश्री'वर दाखल झालेत. त्यांच्यासोबत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आहेत.औरंगाबादमध्ये भाषण करताना मराठीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणार्‍या शिवसेनेची आणि बाळासाहेबांची खिल्ली उडवली होती. आपल्याकडे काही प्राणी असतात. ते घराजवळ दुसरे कुणी आले की गुरगुरतात…शिवसेनेचे सध्या असे चालले आहे. आता मी बाळासाहेबांना भेटणार आहे. आणि सांगणार आहे की, नका खेळात राजकारण आणू..वय झाले…नव्या पिढीला काही तरी राष्ट्रीय विचार सांगा..आम्ही एकमेकांवर जोरदार टीका करतो. पण आमची मैत्री जुनी आहे…अशी फटकेबाजी पवारांनी केली होती.

close