अभ्यंगस्नान आणि तेही गोबर !

November 7, 2015 9:30 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर :  आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अनोख्या गोबर अभ्यंगस्नान महोत्सवाचे आयोजन जळगावात करण्यात आलं. गाईचं शेण आणि गोमुत्राने अंघोळ करून अनेक जणांनी या गोबर अभ्यंगस्नान महोत्सवात आपला सहभाग नोंदविला.

gobar sannaगोमातेवर रचलेल्या अनेक पारंपारिक गाणी म्हणत आणि नृत्य करत एकमेकांच्या अंगाला शेणाने माखावल गेलं. वसुबारसच्या मुहुर्तावर गाईचं शेण आणि गोमुत्राने अंघोळ करून अनेक जणांनी या गोबर मोहोत्सवात आपला सहभाग नोंदविला.

शंभराच्यावर गो सेवकांनी आणि गो प्रेमींनी -गोमुत्र, गाईचे शेण आणि काळी माती याने आपल्या संपूर्ण शरीराला माखावत अनोख्या पद्धतीने हा महोत्सव साजरा केला. गोबर अभ्यंगस्नान महोत्सव देशी गाई सह तिच्या शेणाचे आणि गोमुत्राचे महत्त्व सर्वसामान्न्यांपर्यंत पोहोचावे या साठी जळगाव येथे अनोख्या गोबर अभ्यंगस्नान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close