माजी सैनिकांना केंद्राकडून दिवाळी भेट, वन रँक, वन पेंशनची अधिसूचना जारी

November 8, 2015 7:55 AM0 commentsViews:

one rank one208 नोव्हेंबर : केंद्र सरकारने माजी सैनिकांना दिवाळीची भेट दिली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वन रँक, वन पेंशन योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचं आता फळ त्यांना मिळणार आहे.

वेगवेगळ्या वेळी एकाच पदावर रिटायर झालेल्या सैनिकांना कमी अधिक प्रमाणात पेन्शन मिळतं. आता त्यामध्ये सुसूत्रता येईल. माजी सैनिकांची संघटना आज दिल्लीत भेटून सरकारच्या अधिसूचनेवर विचार करणार आहे.

या अधिसूचनेनुसार दर पाच वर्षांनी पेन्शन वाढवण्यावर विचार होणार आहे. परंतु, माजी सैनिकांची मागणी आहे की दर वर्षी हा विचार व्हावा. आमचा संघर्ष सुरूच राहील, असं माजी सैनिकांच्या संघटनेनं स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close