अखेर सह्याद्री फार्म हाऊसला आली जाग, गाईंना पुरवला 60 टन चारा

November 9, 2015 9:44 PM0 commentsViews:

baramati _gai09 नोव्हेंबर : बारामतीतील सह्याद्री काऊ फार्मकडून शेतकर्‍यांची बिलं अडवण्याचा प्रकार आयबीएन लोकमतने उघडकीस आणल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागं झालंय. आज या कंपनीने गाईना तब्बल 60 हजार टन हिरवा चारा आणलाय. तर 162 शेतकर्‍यांना तब्बल 37 लाख रुपयांचं वाटप रोख केलंय. तसंच शेतकर्‍यांची उर्वरित रक्कमही लवकरच दिली जाणार असल्याचं कंपनी प्रशासनानं सांगितलंय. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

सह्याद्री काऊ फार्ममधील येथील गाई चारा न मिळाल्याने तर-फडून मरत आसल्याचे चित्र दाखवले होते. यावर सामाजिक संघटना आणि शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर चारा घेऊन गेल्याअसता कंपनी व्यवस्थापनाने चारा स्वीकारला नाही. या बातमीचा आपण सतत पाठपुरावा करत होतो. याची दखल घेऊन कंपनीला खडबडून जाग आली. तर शेतकर्‍यांची आयबीएन लोकमतमुळे दिवाळी गोड होणार आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकरी सांगायला विसरले नाहीत. पेढे वाटून या शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close