पवनहंस हेलिकॉप्टर दुर्घटनेतील एकाचा मृतदेह सापडला

November 9, 2015 10:14 PM0 commentsViews:

Hansraj helicopter09 नोव्हेंबर : मागील आठवड्यात दक्षिण मुंबईजवळील समुद्रात पवनहंस कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. आठवड्याभराच्या
शोधमोहिमेनंतर तटरक्षक दलाला आज एका पायलटचा मृतदेह सापडलाय. पण, या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

गेला आठवड्यात 4 नोव्हेंबर बुधवारी संध्याकाळी 7:30 च्या सुमारास पवनहंसचे हेलीकॉप्टर मुंबई हाय जवळ समुद्रात कोसळलं होतं. त्यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि कोपायलट होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडलाय. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाची संयुक्तरीत्या शोध मोहीम गेले पाच दिवस सुरू आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे कॉकपीट आज संध्याकाळी सापडले. याच कॉकपीटमध्ये एक मृतदेह सापडला आहे. पण हा मृतदेह पायलटचा आहे की कोपायलटचा हे समजू शकलेला नाही. नौदल आणि तटरक्षक दलाची शोध मोहीम सुरू रहाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close