टेन्शन कायको लेनेका…

February 7, 2010 2:31 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीशाहरुख खानने माफी मागावी या मागणीसाठी शिवसेनेने गेले काही दिवस वातावरण तापवले आहे. शाहरुखनेही माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. शाहरुख मुंबईत पोहोचल्यावर त्याला शिवसैनिक जोरदार विरोध करतील, असा अंदाज होता. पण शिवसैनिक विमानतळाकडे फिरकलेच नाहीत. असे असले तरी याबाबतचा तणाव कायम आहे. पण हे टेन्शन दूर ठेवत शाहरुखने आज आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. मुंबईत झालेल्या त्वायकांडो स्पर्धेत त्याची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन या दोघांनीही भाग घेतला होता… आणि त्यांना चिअर करण्यासाठी शाहरुखने पत्नी गौरीसह हजेरी लावली. प्रेक्षकांमध्ये बसून शाहरुखने या स्पर्धेची चांगलीच मजा लुटली. शिवाय आपल्या दोन्ही मुलांनी गोल्ड मेडलची कमाई केल्याची माहितीही किंग खानने लगेचच ट्विटरवर टाकली. यात या माफी प्रकरणावरुन आपण काहिसे नर्व्हस असल्याचेही त्याने नमूद केले आहे.

close