आदिवासी महिलांच्या अश्लील फिल्म्स बनवणारा अटकेत

February 7, 2010 2:46 PM0 commentsViews: 7

5 फेब्रुवारीमोबाईल फोनवरुन महिलांचे अश्लील चित्रीकरण करून त्याच्या फिल्म्स बनवून विकणा-या टोळीच्या म्होरक्याला जव्हार पोलीसांनी अटक केली आहे. जव्हार आणि आसपासच्या परिसरात या फिल्म्स विकल्या जात होत्या. ठाणे जिल्ह्याच्या या आदिवासी भागात अशा प्रकारचे सेक्स स्कँडल उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जहीर शेख असे या म्होरक्याचे नाव आहे. त्याने एका आदिवासी विधवा महिलेला प्रेमात अडकवले होते. जव्हारच्या राजमहाल हॉटेलमध्ये तिला आणून त्याने तिचे लैंगिग शोषण करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्याची फिल्म बनवून त्याने ती मित्र गिरीश चांदवानीच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात विकली. ही फिल्म पोलिसांनी गिरीश चांदवानी याच्या 'भारत झेरॉक्स आणि कम्प्युटर सेंटर'मधून जप्त केल्या आहेत.या चित्रफितींची माहिती संबंधित महिलेच्या भावाला कळताच या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तर जप्त केलेल्या चिप्स आणि सीडींमध्ये जव्हारमधल्याच इतरही अनेक तरूणी आणि महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

close