पुणे : कोरेगाव पार्कमध्ये कचरा सॉर्टिंग शेडमुळे 200 कुटुंबांचं आरोग्य धोक्यात

November 10, 2015 9:55 AM0 commentsViews:

pune_koregaon410 नोव्हेंबर : पुण्यात उच्चभ्रू लोकांची वसाहत समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्कमधील कचर्‍याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रागविलास हाऊसिंग सोसायटीतील कचरा सॉर्टिंग शेडमुळे या परिसरातल्या जवळपास 200 कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आलंय.

कचरा सॉर्टिंग शेडमधल्या घाणीची दुर्गंधी आणि डासांमुळे इथले नागरिक सारखेच आजारी पडत आहेत. शेडमधल्या घाणीमुळे इथं अमाप डासांचं वास्तव्य आहे. आणि आता पर्यंत तब्बल 50 नागरिकांना खोकला, मलेरिया आणि डेंग्यूची लागण झाली आहे.

भयंकर दुर्गंधीमुळे इथल्या नागरिकांना घरातदेखील मास्क घालून राहावं लागतंय. वारंवार तक्रार करुनदेखील पालिका कचरा सॉर्टिंग शेड हलवत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय. तर पालिका अधिकारी केवळ आश्वासन देतांना दिसत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close