बर्फवृष्टीत 17 जवान मृत्युमुखी

February 8, 2010 10:21 AM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारीजम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीत लष्कराचे 17 जवान मृत्युमुखी पडले आहेत. तर 17 जण जखमी झाले आहेत. तसेच दोघे जण बेपत्ता आहेत. लष्कराच्या प्रशिक्षण शाळेला आज हा बर्फाच्या वादळाचा तडाखा बसला. तीनशे-चारशे जवान हे प्रशिक्षण घेत होते. लष्कराचे प्रवक्ते कर्नल जे. एस. ब्रार यांनी ही माहिती दिली आहे. अजूनही अनेक जण बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

close