सरकारच्या कर्ज माफीमुळे शेतकर्‍यांची ‘दिवाळी’

November 10, 2015 8:32 PM0 commentsViews:

प्रवीण मुधोळकर, नागपूर

10 नोव्हेंबर : शेतकर्‍यांनी नोंदणीकृत सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याच निर्णय सरकारनं घेतला आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनमुळे अनेक शेतकर्‍यांनी गहाण ठेवलेले दागिने त्यांना परत मिळाले आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदात जात आहे.

sdsadsdsay

शशिकला टेकाम यांची यंदाची दिवाळी खास आणि आनंदाची आहे. नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधल्या शेतकरी शशिकला टेकाम, त्यांच्याचेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत आहे. कारण शेतात पेरणी करण्यासाठी त्यांनी सावकाराकडे 3 वर्षांपूर्वी गहाण ठेवलेलं त्यांचं सोन्याचं मंगळसूत्र त्यांना आता परत मिळालं आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं राज्यातल्या नोंदणीकृत सावकारांकडचं शेतकर्‍यांचं कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा केली होती. या योजने अंतर्गत शशिकला यांच्यासारख्या जवळपास सव्वा दोन लाख शेतकर्‍यांची तब्बल 171 कोटी रुपयांची कर्ज माफ होतायत. आणि त्यांनी सावकाराकडं गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांना परत मिळतायत. एकट्या काटोल तालुक्यातल्या 612 शेतकर्‍यांचं कर्ज सरकारनं माफ केलंय. त्यामुळं अनेक शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

सावकारांनी कर्जदार शेतकर्‍यांच्या वस्तू परत केल्याची हमी घेतल्यावर ह्या कर्जाची रक्कम सावकाराच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ऐन दिवाळसणातच सरकारच्या या योजनेमुळं शेतकर्‍यांची दिवाळी चांगली जातेय आणि त्यामुळेच त्यांची उमेदही वाढलीये हे महत्त्वाचं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close