मोदी सरकारचा धमाका, 15 क्षेत्रात एफडीआयच्या नव्या योजना

November 10, 2015 8:58 PM0 commentsViews:

modi on dadari

10 नोव्हेंबर : आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात पुढील पाऊल टाकताना केंद्र सरकारने आज (मंगळवारी) एकूण15 क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा वाढवली आहे. त्यात खाणकाम, संरक्षण, नागरी उड्डाण आणि प्रसारण या प्रमुख क्षेत्रांचाही समावेश आहे.

नागरी विमान वाहतूक, बैंकिंग, संरक्षण, किरकोळ विक्री आणि वृत्तवाहिन्या या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या मंजुरीसाठीची पद्धतीही सुटसुटीत करण्यात आली आहे.

डायरेक्ट टू होम (डीटीएच) क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर माध्यमं यांच्यातील परदेशी गुंतवणूकीच्या मर्यादा वाढवल्या आहेत. देशात व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने टाकलेले हे आणखी एक पाऊल असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी सांगितलं. सरकारने घेतलेले हे सर्व निर्णय तातडीने अंमला येणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close