कोल्हापूरमधली पांरपरिक पद्धतीची ईको फ्रेंडली दिवाळी

November 11, 2015 9:47 AM0 commentsViews:

अनिल तळगुळकर, चंदगड, कोल्हापूर

11 नोव्हेंबर : दिवाळीचा सण म्हणजे मांगल्याचा सण. ग्रामीण भागात या सणाचा बाज काही औरच असतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये दिवाळीमध्ये घराच्या अंगणात शेणाचा वाडा बनवून तो फुलांनी सजवला जातो आणि पांरपरिक पद्धतीची ईको फ्रेन्डली दिवाळी साजरी केली जाते.

chandgad sadh

दिवाळी सणात सर्वांच्या घरी आनंदाला उधाण आलेलं असतं. ग्रामीण भागात याच सणादरम्यान सुगीचा हंगाम असतो. तरीही आपली पांरपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष करून महिला आघाडीवर असतात. कोल्हापूरच्या काही तालुक्यांमध्ये पारंपरिक इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीमध्ये दररोज सकाळी घराचं अंगण शेणाच्या सड्यानं शिंपून या सड्यावर घरातील सर्व स्त्रिया मिळून शेणाचा वाडा तयार करतात. हा वाडा झेंडूच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवला जातो. या वाड्यामध्ये दूध, दही, झाडू ठेवला जातो. या वाड्यासमोरच बहीण आपल्या भावांचं औक्षणही करते.

ग्रामीण भागाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारीत आहे. दिवाळीच्या दिवशी जो शेणाचा वाडा सजवला जातो त्याला पुराणकाळातील संदर्भ असल्याचं जुनेजाणती मंडळी सांगतात.

या सणात प्रामुख्यान ग्रामीण जीवन हे शेती, जनावरे याशिवाय परिपूर्ण नाही हे दाखवलं जातं. फटाके न फोडता पर्यावरणपुरक दिवाळी साजरी केली जाते आणि सहजपणे प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेशही या माध्यमातून दिला जातो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close