डीजीपी राठोडवर हल्ला

February 8, 2010 10:47 AM0 commentsViews: 3

5 फेब्रुवारीरुचिका गिरहोत्रा केस प्रकरणातील आरोपी, माजी डीजीपी राठोडवर आज चंदीगड कोेर्टाबाहेरच हल्ला झाला. जखमी राठोडला पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. रुचिका गिर्‍होत्रा केस आजपासून रि-ओपन करण्यात आली. त्याचीच इन कॅमेरा सुनावणी सुरू होणार होती. त्यासाठीच एसपीएस राठोडला कोर्टात आणण्यात आले होते. त्याचवेळी कोर्टाच्या बाहेर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लानंतर राठोड जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, तो मुक्त पत्रकार असल्याची माहिती मिळत आहे. या सुनावणीसाठी रुचिकाच्या कुटुंबीयांना सुनावणीला हजर राहणार होते. मीडियाला मात्र सुनावणीला हजर राहण्याची परवानगी नव्हती. 15 वर्षांची टेनिसपटू रुचिकाचा विनयभंग केल्याचा राठोडवर आरोप आहे. या प्रकारानंतर रुचिकाने आत्महत्या केली होती.21 डिसेंबरला रुचिकाच्या मृत्यूप्रकरणी राठोडला दोषी ठरवण्यात आले होते.