शाहरूख ठाम…

February 8, 2010 12:38 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीआपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत, कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे शाहरुखने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. माझ्या मतांबद्दल किंवा माझ्या भूमिकेवर जर कोणाचा राग असेल तर त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका करावी…दोषारोप करावेत..पण त्यासाठी माझ्या फॅन्सना वेठीस धरु नये, असेही त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर बॉलीवूड कोणालाही घाबरत नाही, असा टोलाही त्याने मारला आहे. 'आयबीएन 18'चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत शाहरुखने हे शिवसेनेला सुनावले आहे.

close