तुमचीही कलबुर्गी यांच्यासारखीच अवस्था करू, कर्नाड यांना धमकी

November 12, 2015 2:30 PM0 commentsViews:

P12 नोव्हेंबर : नाटककार गिरीश कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. बंगळुरूच्या केम्पेगौडा एअरपोर्टला टिपू सुलतानचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना ट्विटरवरून धमकी मिळालीय. कन्नड साहित्यिक एम एम कलबुर्गी यांच्यासारखीच अवस्था होईल, असं त्यांना धमकावण्यात आलंय. पण हे ट्विट नंतर डिलीट करण्यात आलं. दरम्यान, आपण एअरपोर्टचं नाव बदलण्याची मागणी कधीच केली नव्हती, असं कर्नाड यांनी सीएनएन-आयबीएनशी बोलताना सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close