आधी सर्व घटकांशी चर्चा करा, नंतर FDI ची अंमलबजावणी, संघाची सरकारकडे मागणी

November 12, 2015 4:13 PM0 commentsViews:

modi on dadari12 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजप आणि संघामध्ये आरोप प्रत्यारोपाची ठिणगी पडली होती. भाजपच्या काही नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरच टीका केली होती. आता त्यात एफडीआयच्या मुद्यामुळे भर पडलीये. एफडीआयच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारनं सर्व घटकांशी चर्चा करावी, असा सल्ला संघाने दिलाय.

ब्रिटन दौर्‍यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 क्षेत्रांतल्या एफडीआयच्या सुधारणांसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय पण त्याला आता विरोध होतोय. संघाशी संबंधित भारतीय मजदूर संघानं या थेट परकीय गुंतवणुकीला विरोध केला आहे. भारतीय मजदूर संघाने नरेंद्र मोदी आणि यशवंत सिन्हा यांना पत्र लिहिलंय. एफडीआयच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारनं सर्व घटकांशी चर्चा करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close