पाडव्याचा गोडवा, अखेर कोल्हापुरात गुळाचे सौदे पडले पार !

November 12, 2015 2:24 PM0 commentsViews:

Kolhapur_gul_12 नोव्हेंबर : आज  पाडव्यानिमित्ताने कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे पार पडले. त्यामध्ये यंदा गुळाला सरासरी 2300 ते 3700 रुपये दर देण्यात आलाय. साखर कारखाने हे जरी पूर्णपणे सुरू नसले तरी कोल्हापूर जिल्ह्यातली गुर्‍हाळघरं सुरु झाली आहेत. त्यामुळं यंदाचा नवीनं गुळ आता सणाच्या निमित्तानं बाजारात येणार आहे.

जिल्ह्यातल्या हजारो शेतकर्‍यांनी आज आपला गुळ विक्रीसाठी आणला होता. त्यामुळं व्यापार्‍यांनीही गुळ खरेदीला प्रतिसाद देत यंदाचा नवीन दर जाहीर केलाय. दरम्यान, उसाच्या एफआरपी प्रमाणंच गुळालाही दर मिळावा अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केलीय. गुळाचा उत्पादन खर्च पाहता विक्री होऊन होणारा नफा खूपच कमी असल्यानं ज्याप्रमाणं मराठवाड्यातला शेतकरी अडचणीत आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यातला गुळ उत्पादक शेतकरीही आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अजूनही गुळाला वाढवून दर मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकर्‍यांनी केलीय. त्यामुळं कोल्हापूरची गुळाची बाजारपेठ टिकवण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार का हा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close