पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमध्ये दाखल

November 12, 2015 5:07 PM0 commentsViews:

modi_in_uk_new12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या ब्रिटन दौर्‍यासाठी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. तब्बल 10 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ब्रिटन दौर्‍यावर आहेत. तीन दिवसांच्या या दौर्‍यात पंतप्रधान लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत.

आज संध्याकाळी इंग्लंडमधील शिख समुदायांशी ते संवाद साधणार आहेत. तर साडेसहाच्या दरम्यान ते ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांच्याशी भेट घेणार आहेत.

या दौर्‍यात ब्रिटनबरोबर आर्थिक सहकार्य वाढवण्यावर या दौर्‍यात भर दिला जाणार आहे. विशेषतः द्विपक्षीय व्यापार वाढवणे, संरक्षण क्षेत्रामध्ये भागीदारी वाढवणे यावर भर दिला जाणार आहे.

 दौर्‍यादरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मेजवानीचं आयोजन केलं आहे. आपल्या ब्रिटन दौर्‍यात पंतप्रधान मोदी ब्रिटिश संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close