चंदगडजवळ 35 एकर ऊस जळून खाक, ऐन दिवाळीत शेतकर्‍यांवर संक्रांत

November 12, 2015 5:18 PM0 commentsViews:

cane_fire-216x16012 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील निट्टूर जवळील उसाच्या फडाला आग लागून सुमारे 35 एकर ऊस जळालाय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी 11.30 च्या सुमारास ही आग लागली होती आणि दुपारी 2.30 पर्यंत सुरू होती. तीन तास सुरू असलेल्या या आगीमुळ शेतकर्‍यांचं लाखो रूपयांचं नुकसान झालं आहे.

ऐन दिवाळी दिवशीच ही आग लागल्यानं शेतकर्‍यांच्या आनंदावर विरजन पडलं आहे. पंधरा शेतकर्‍यांचा ऊस या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय.

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close