जीवघेणी प्रथा! गुराखांच्या अंगावरून धावतात गायी!!!

November 13, 2015 3:25 PM0 commentsViews:

हरिष मोटघरे, भंडारा
गाई अंगावरुन गेल्या की गाव रोगराईपासून मुक्त, असा समज आहे भंडार्‍यातील एका गावाचा… या अंधश्रध्देतून इथे जन्माला आली एक जीवघेणी पंरपरा…

अंगावर काटा आणणारी ही दृष्ये आहेत भंडारा जिल्ह्यातील. मोहाडी गावात वाजतगाजत या गाईंची मिरवणूक निघाली आहे. एक नव्हे तर तब्बल दिडशे गाई या तरुणाच्या अंगावरुन सोडल्या जात आहेत. सरंक्षणासाठी या गुराख्याच्या डोक्यावर केवळ एक कपडा बांधलेला आहे. गेल्या 300 वर्षापासून या गावात ही पंरपरा सुरू आहे.

bhandara gayi

विनायक परतेती, हा सर्वसामान्य गुराखी आहे. मात्र पाडव्याच्या दिवशी तो गावातील हिरो आहे. तीन वर्षापासून तो आपल्या वडीलासोबत या प्रथेत सहभागी झाला आहे. त्याच्या अंगावरुन गाई जातांना बघून विनायकच्या आईला जराही भिती वाटत नाही.

पाडव्याच्या दिवशी गावातल गोधन गुराख्याच्या अंगावरुन चालत जावून गावाबाहेर गेल, तर गावातील रोगराई गावाबाहेर जाते अशी भाबडा समज या गावकर्‍यांचा आहे. त्यामुळे जिव धोक्यात घालून विनायकसारखे तरुण या अमानूष प्रथेच पालन करतात.

आजपर्यंत कुणीही जखमी झालं नसल्याचा दावा गावकर्‍यांनी केला आहे. तरीही ही अघोरी प्रथा केव्हा बंद होईल हा प्रश्न कायम आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close