बेस्ट ऑफ फाईव्ह लागू

February 8, 2010 1:51 PM0 commentsViews: 6

5 फेब्रुवारीअकरावी प्रवेशासाठी यंदा बेस्ट ऑफ फाईव्ह लागू करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र शिक्षण मंडळानं जाहीर केला आहे. यावर्षी एसएससी पास होणार्‍या विद्यार्थ्यांचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धतीने जाहीर करण्यात येईल. ICSE आणि CBSC हे बोर्ड पाच सर्वोत्तम विषयांतील टक्केवारी दिली जाते. तसाच फॉर्म्युला SSC बोर्डानेही वापरावा, म्हणजे बोर्डांचे समानीकरण होईल, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून होत होती. त्याच दृष्टीने हा निर्णय झाला आहे.हा बेस्ट फाईव्ह फॉर्म्युला म्हणजे…- दहावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांमध्ये पास व्हावं लागणार आहेच, पण अकरावीसाठी ऍडमिशन घेताना अधिक गुण मिळालेल्या पाच विषयांची टक्केवारी ग्राह्य धरण्यात येईल… – मार्कलिस्टवर सगळ्याच विषयांचे मार्कस् आणि ग्रेड दाखवले जातील. – यावर्षी होणा-या एसएससी परीक्षेपासूनच हा फॉर्म्युला लागू होईल.

close