मॅगीवर पुन्हा बंदीसाठी राज्य सरकार पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात

November 13, 2015 2:39 PM0 commentsViews:

Maggi foah

13 नोव्हेंबर : मॅगीच्या विक्रीला परवानगी देण्याच्या मुंबई हाय कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात दाखल झालेल्या मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे.

काही अटींवर मुंबई हाय कोर्टाने मॅगीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयाला अन्न व औषध प्रशासनाने आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मॅगीवरील बंदी कायम ठेवण्यासाठी येत्या आठवडाभरात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय एफडीएने घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाची परवानगीसुद्धा घेण्यात आली आहे.

देशातील तीन वेगवेगळया प्रयोगशाळांमध्ये मॅगीचे नमुने तपासण्यात आले. त्यात मॅगी खाण्यायोग्य असल्याचा अहवाल आला होता. या पार्श्वभूमीवर काही अटींवर मॅगीच्या विक्रीला हायकोर्टाने परवानगी दिली. त्यानंतर बाजारात दाखल झालेल्या मॅगीची 60 हजार पाकीटं अवघ्या 5 मिनिटांत विकल्याचा दावा स्नॅपडीलने केला आहे. मात्र, आता एफडीएच्या नव्या भूमिकेमुळे मॅगीच्या विक्रीवर बंदी येण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close