भुजबळांच्या अडचणीत वाढ, देविशा कन्स्ट्रक्शनचा भूखंड ईडीच्या ताब्यात

November 13, 2015 9:17 PM0 commentsViews:

Chagan Bhujbal

13 नोव्हेंबर : ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुजबळांच्या देविशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे असलेला 160 कोटींचा भूखंड ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयानं जप्त केला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे.

नवी मुंबईतील खारघर परिसरात भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीचा भूखंड आहे. या भूखंडाची किंमत तब्बल 160 कोटी रुपये आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्ड्ररिंग ऍक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 15 सप्टेंबरला अंमलबजावणी संचलनालयाने छगन भुजबळांसह 19 जणांविरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भूखंड जप्तीची ही कारवाई केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close