दहशतवादी हल्ल्याने पॅरिस हादरलं, 153 ठार

November 14, 2015 6:57 PM0 commentsViews:

 

14 नोव्हेंबर : फ्रान्सची राजधानी पॅरिस भीषण दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. पॅरिसमध्ये एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 153 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहे. 80 हुन अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

paris_attack

या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने देशाच्या सीमा बंद करत देशात संचारबंदी लागू केली आहे. हा हल्ला करणार्‍या 8 दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याची माहिती फ्रान्स पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

पहिला हल्ला पॅरिसच्या स्ताद द फ्रान्स स्टेडियमच्या बाहेर झाला. यावेळी स्टेडियममध्ये फ्रान्स-जर्मनीमध्ये फुटबॉल मॅच सुरू होती. या दरम्यान स्टेडियमजवळ दोन आत्मघाती हल्ले झाले. हा हल्ला झाला तेव्हा स्टेडियममध्ये फ्रान्सचे राष्ट्रपतीही फ्रांस्वा ओलांद ही उपस्थित हाते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तर दुसरीकडे एका रेस्टॉरेंटमध्ये गोळीबार झाला. अश्याप्रकारे गोळीबारासह 7 ठिकाणी आत्मघाती हल्ले झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे. तर पॅरिसमध्ये असलेले भारतीय नागरिक सुखरूप असल्याचे भारतीय दुतावासाने सांगितले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close