यश शहा खून प्रकरणी चौघे अटकेत

February 8, 2010 2:35 PM0 commentsViews: 4

5 फेब्रुवारीडोंबिवलीतील यश शहा अपहरण आणि खून प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. 8 महिन्यांपूर्वी यशचे अपहरण करुन खून करण्यात आला होता. त्यानंतर तुषार सोनी या विद्यार्थ्याचेही 2 फेब्रुवारीला अपहरण झाले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला. तुषार सोनीचा मृतदेह राकेश लाखराच्या घरात आढळला. या दोन्ही घटना एकाच पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या दिशेने तपास करण्यात आला. त्यातूनच या दोन्ही प्रकरणातील आरोपी एकच असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी या प्रकरणी राकेशसह संतोष पडचिंते, किशोर शिंदे आणि जॉय चौधरी यांना अटक केली आहे.

close