नाशिकमध्ये युवा महोत्सव

February 8, 2010 3:13 PM0 commentsViews: 6

5 फेब्रुवारीनाशिक शहरात 'लोकमत' आणि 'संदीप फाऊंडेशन'च्या वतीने दोन दिवसांच्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात विविध विषयांवर वादविवाद स्पर्धा, एकपात्री अभिनय, युगुल गीत, चित्रकला अशा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सोमवारी सकाळी राज्याच्या 18 जिल्ह्यांमधून आलेल्या तरुणांनी शहरात ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर दिंडी काढली. शहराच्या मध्यवर्ती भागांतून वेगवेगळे चित्ररथ आणि वेषभूषा केलेल्या या तरूणांनी नाशिककरांचे लक्ष या विषयाकडे वेधून घेतले.

close