मुस्लिम आरक्षणाला हिरवा आणि लाल झेंडा

February 8, 2010 3:54 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीआज पश्चिम बंगालमधल्या बुद्धदेव सरकारने मुसलमानांमधील ओबीसी समाजासाठी नोकर्‍यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. या राज्यात पुढच्या वर्षीच विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने या घोषणेला मतांच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच आंध्र प्रदेश हायकोर्टाने धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. कोर्टाने आंध्र प्रदेशातील मुस्लिमांसाठी असलेले 4 टक्के आरक्षणसुद्धा रद्द केले आहे. त्यामुळे आता मुस्लिम आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. 2004पासून तिसर्‍यांदा मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव हायकोर्टाने फेटाळला आहे.

close