सेना आमदारांनी गमावले संरक्षण

February 9, 2010 10:04 AM0 commentsViews: 2

9 फेब्रुवारीकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणार्‍या शिवसेनेच्या आमदारांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. तसेच शाहरुखविरोधात आंदोलन करणार्‍या आमदारांनाही पोलीस संरक्षण गमवावे लागले आहे. रवींद्र वायकर, प्रकाश सावंत, आणि अनिल परब यांच्या विरोधात ही कारवाई झाली आहे. पोलीस संरक्षणात आंदोलने केल्याने त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. राहुल गांधींनी काळे झेंडे दाखवताना वायकर आणि सावंत यांना पोलीस संरक्षण होते. तर शाहरुखच्या 'मन्नत'वर आंदोलन करणारे अनिल परबही पोलीस संरक्षणात होते. मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या आदेशानुसार हे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. वायकर आणि सावंत हे विधानसभेचे तर परब हे विधान परिषदेचे आमदार आहेत.

close