पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हाय अलर्ट

November 14, 2015 1:57 PM0 commentsViews:

Mumbai alert

14 नोव्हेंबर : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये 26/11 ला झालेल्या हल्ल्याची आठवण करुन देणारा फ्रान्समधील हा दहशतवादी हल्ला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 6 ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले.यामध्ये 153 नागरिक ठार झाले आहेत तर 200 च्यावर जखमी झाले आहेत.

पॅरिसच्या हल्ल्यानंतर मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईतील फ्रान्स नागरिकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईलगतच्या सागरी किनार्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शहरातही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतल्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close