पंतप्रधानांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधल्या घराचं लोकार्पण

November 14, 2015 6:33 PM0 commentsViews:

 

14 नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य असलेल्या लंडनमधल्या घराचं आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. आंबेडकरांचे घर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

CTxJbqqUEAAHKgE

राज्य सरकारने हे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया बराच काळ रखडली होती. तब्बल आठ महिने रखडलेल्या या प्रक्रियेमुळे घर ताब्यात घेण्यासाठी घरमालकाने राज्य सरकारला शेवटची मुदतही दिली होती. त्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली होऊन लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन घरमालकाला देण्यात आले होते. अखेर येत्या 12 सप्टेंबरला आंबेडकर निवासाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

डॉ. आंबेडकर 1921-22 या कालावधीत शिक्षणासाठी लंडनला गेले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी त्यावेळी डी.एस.सी. ही पदवी संपादन केली. त्यावेळी बाबासाहेबांचे 10 किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-3, लंडन या इमारतीत वास्तव्य होते.

कसं आहे हे बाबासाहेबांचं हे घर?

– विकायला काढलेलं ते घर प्रत्यक्षात स्वतंत्र आहे. पण एकास एक चिकटून असलेल्या दोन घरांचं मिळून बनलेलं होतं.
– एक घर केवळ 620 चौरस फुटांची आहे.
– त्यात एक बैठकीची खोली, एक झोपण्याची खोली आणि लहानसा बगीचा असलेलं उघडं आवार आहे.
– तर दुसरं घर 1,882 चौरस फुटांचं
– त्यात एक प्रशस्त बैठकीची खोली, लहानसे स्वयंपाकघर असून वरच्या दोन मजल्यांवर पाच खोल्या झोपण्यासाठीच्या आहेत.

दरम्यान, इंदू मिलनंतर आता लंडनच्या बाबासाहेब स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राज्य सरकारचा हा कार्यक्रम असूनदेखील विरोधी पक्षनेत्यांना डावलण्यात आल्याची टीका दोन्ही विरोधीपक्ष नेत्यांनी केली आहे. इंदू मिलनंतर या कार्यक्रमालाही पक्षीय स्वरुप देत असल्याची टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर बाबासाहेबांच्या घटनेतील लोकशाही मुल्यांना सरकार पायदळी तुडवत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close