तहसील कार्यालयात शेतकर्‍याची आत्महत्या

February 9, 2010 10:21 AM0 commentsViews: 35

9 फेब्रुवारीतहसील कार्यालयाच्याआवारातच शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. महादेव सांगडे असे या 70 वर्षीय शेतकर्‍याचे नाव आहे.पोटगीसाठी त्यांचे मुलाशी भांडण सुरू होते. मोहोळ कोर्टाने महादेव यांना पोटगी देण्याचे आदेश त्यांच्या मुलांना दिले होते. पण मुलाने पोटगी देण्यास नकार दिला होता. मोहोळ पोलिसांनी याप्रकरणी मुलगा आणि वडिलांमध्ये मध्यस्थीही केली होती.

close