नितीश कुमार यांची ‘जदयू’च्या विधिमंडळ नेतेपदी निवड

November 14, 2015 4:05 PM0 commentsViews:

nitish-kumar-52

14 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या जदयूच्या आमदारांनी आज (शनिवारी) नितीश कुमार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली. त्यापूर्वी शनिवारी सकाळी सध्याच्या मंत्रिमंडळाकडून बिहार विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारला असला तरी नवे सरकार स्थापन होईपर्यंत नितीश कुमार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-राजद महाआघाडीने तब्बल 178 जागांवर विजय मिळवत भाजपला धूळ चारली होती. भाजपला अवघ्या 58 जागांवरच समाधान मानाव लागलं होता.

दरम्यान,  येत्या 20 नोव्हेंबरला नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. दुपारी 2 वाजता नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. सर्वसाधारण निवडणुकीनंतर तिसर्‍यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close