पोलिसांच्या सुट्टया रद्द

February 9, 2010 10:35 AM0 commentsViews: 2

9 फेब्रुवारीशिवसेनेचे मुंबईतील आंदोलन आता पोलिसांच्या सुट्टयांच्या मुळावर आले आहे. माय नेम इज खान या सिनेमाच्या विरोधातील शिवसेनेच्या आंदोलनामुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुट्टयाच रद्द करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. माय नेम इज खान या सिनेमाला सुरक्षा पुरवण्यासाठी अशा प्रकारे पोलिसांना वेठीला धरण्यात आले आहे. संपूर्ण शहरातील थिएटर्समध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत.

close