सागर शेजवळ खूनप्रकरणातील फरार आरोपी अटकेत

November 15, 2015 2:48 PM0 commentsViews:

sagar killed

15 नोव्हेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाण्याचा मोबाइलवर रिंगटोन लावला म्हणून युवकाचा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी दापोडी इथून अटक केली. शिर्डी इथल्या बिअर बारमध्ये 16 मे 2015 रोजी ही घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते.

किरण अजबे असं या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह धनंजय काळे आणि एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे

सागर शेजवळ (वय 21) हा तरुण नाशिकहून नातेवाइकाच्या लग्नासाठी शिर्डीला गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास तो चुलत भावाबरोबर बिअर बारमध्ये गेला होता. तिथे त्यांच्या मागील बाजूला आठ स्थानिक तरुण बसले होते. या वेळी सागरला एक फोन आला. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एका गाण्याची रिंगटोन वाजली. ती बंद करण्यावरून त्या तरुणांशी त्याचा वाद झाला. दरम्यान, तरुणांनी त्याला बेदम मारहाण करून बारबाहेर आणलं आणि जवळच्या जंगलात नेऊन त्याची क्रूर हत्या केली. या हत्येमुळे संतप्त संघटनांनी पोलीस यंत्रणेला धारेवर धरलं होतं.

भोसरी पोलिसांनी काल दुपारी पुण्याजवळच्या दापोडी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार किरण, धनंजय आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी किरण आजबे याने शीर्डीत सागर शेजवळ खुनप्रकरणात सहभागी असल्याची कबूली पोलिसांकडे दिली आहे. सध्या किरण अजबे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close