दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणं गरजेचं – मोदी

November 15, 2015 7:05 PM0 commentsViews:

CT2XWtxUkAE19Gr

15 नोव्हेंबर : दहशतवादारोधात संपूर्ण जगाने एकत्रितरित्या ठामपणे उभं राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) केलं आहे. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्व तीव्र निषेध करतो. दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणं गरजेचं आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

तुर्कस्तानात जी 20 परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी दहशतवादाविरोधात मत मांडले. मोदी म्हणाले, पॅरिसमधल्या या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व जग एकत्र आलं आहे. दहशतवादाविरोधात सर्व मानवतेनं एकत्रितरित्या ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाच्या आव्हानाविरोधात जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची अत्यंत निकड आहे. हा विषय ब्रिक्स देशांच्याही प्राधान्यक्रमावर असायला हवा, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अंकारा, बेरुतमध्ये झालेले हल्ले दहशतवादी किती वेगाने पाय पसरत आहेत याचे हे संकेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close