दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं

November 15, 2015 7:46 PM0 commentsViews:

petrol_price_hike

15 नोव्हेंबर : पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे 36 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे 87 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री 12 वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे.

रविवारी संध्याकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केलं आहेत. ऐन दिवाळीत डाळींच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या दिवाळं निघालं होतं. आजपासून सेवा करासोबतच अतिरिक्त 0.5 टक्के स्वच्छ भारत अधिभार लागू झाल्याने रेल्वेप्रवासही महागला आहे. त्यापाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागतील असं दिसतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close