कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

November 16, 2015 4:23 PM0 commentsViews:

KMC

15 नोव्हेंबर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी अखेर काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार सविता भालकर यांचा 11 मतांनी पराभव केला. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला यांची निवड झाली.

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मतदान घेण्यात आलं. एकूण 77 सदस्य मतदानासाठी उपस्थित होतं. अश्विनी रामाणे यांना 44 तर सविता भालकर यांना 33 मतं पडली. शिवसेनेचे चार नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहिले होते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला.

मतमोजणीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असं चित्र होतं. पण ऐनवेळी भाजप-ताराराणी आघाडीनेही महापौरपदासाठी अर्ज सादर केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. पण कोल्हापूरमध्ये महापौरपद मिळवण्याचं भाजप आणि ताराराणीचं स्वप्न अखेर भंगलं आणि कोल्हापूरच्या महापैरपदावर अखेर काँग्रेसनेच बाजी मारली. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी गुलालाची उधळून जल्लोष साजरा केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close