अव्वल स्थान धोक्यात

February 9, 2010 11:36 AM0 commentsViews: 8

9 फेब्रुवारीनागपूर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने अखेर भारताचा एक इनिंग आणि 6 रन्सनी पराभव केला आहे . त्याचसोबतच सीरिजमध्येही 1-0 ने विजय मिळवला आहे. दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय मिडल ऑर्डर आणि तळाच्या बॅट्समननी बर्‍यापैकी झुंज दिली. पण अखेर टी ब्रेकनंतर थोड्या वेळातच भारताची दुसरी इनिंग 319 रन्समध्ये संपुष्टात आली. दुसर्‍या इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरने झुंजार सेंच्युरी ठोकली. टेस्टमधली सचिनची ही 46वी सेंच्युरी. सचिनने आणि मुरली विजय आणि मग कॅप्टन धोणीबरोबर हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली. पण सेंच्युरीनंतर सचिन लगेचच आऊट झाला. आणि थोड्याच वेळात धोणीही 25 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर मग तळाच्या बॅट्समननी थोडीफार लढत दिली. पण अखेर ही लढत अपुरी ठरली. आफ्रिकेतर्फे पॉल हॅरिसने तीन विकेट घेतल्या.

close