रामदेवबाबांचे ‘पतंजली नूडल्स’ आजपासून बाजारात

November 16, 2015 2:48 PM0 commentsViews:

2015_10$largeimg23_Friday_2015_224554789

16 नोव्हेंबर : बाजारात मॅगीची क्रेझ पाहता रामदेव बाबांच्या पतंजलीनेही आपले नूडल्स बाजारात आणले आहेत. आजपासून ही नूडल्स देशभरातील 40 हजार किराणा दुकानांमध्ये तसंच बिग बझार आणि रिलायन्स फ्रेशसारख्या मॉलमध्ये उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, नेस्ले इंडियाची मॅगी चार ते पाच महिन्यांनंतर भारतीय बाजारात परतत असतानाच रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे नूडल्सही बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही नूडल्सची एकमेकांशी स्पर्धा असेल, हे नक्की.

पतंजलीच्या 70 ग्रॅम मॅगीच्या पाकिटाची किंमत 15 रूपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॅगीपेक्षा पतंजलीची मॅगी अधिक पोष्टीक असून, यामध्ये 70 टक्के गव्हाच्या पीठाचाच वापर करण्यात आल्याचा दावा पतंजलीच्यावतीने करण्यात आले आहे.

आरोग्यास अपायकारण घटक आढळून आल्यानंतर प्रसिद्ध नेस्ले कंपनीच्या मॅगीला ग्रहण लागले. भारतीय बाजारातील मॅगीची वाढती मागणी लक्षात घेऊन योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली फुडच्यावतीने पतंजली नूडल्स बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. झट पट पकाओ, और बेफिक्र खाओ’ अशी या नूडल्सची टॅगलाईन ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॅगीसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, रामदेव बाबा यांचे नूडल्स नेस्ले इंडियाच्या मॅगीला टक्कर देते का?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close