नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याचं शिवसेनेला निमंत्रण!

November 16, 2015 6:45 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan

16 नोव्हेंबर : बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला होणार्‍या नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचेही नेतेही उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे. शपथविधी सोहळ्याला आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण मिळालं असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि रामदास कदम यांच्यापैकी कोणीतरी उपस्थित राहतील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जदयू, राजद आणि काँग्रेस महाआघाडीला घवघवीत यश मिळाले. लालूप्रसाद यादव यांचा राजद सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. येत्या शुक्रवारी नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी देशातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. नितीशकुमारांनी उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचं फोनवरून निमंत्रण दिलं. नितीशकुमारांचे निमंत्रण आपण स्वीकारलं असून, शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई किंवा रामदास कदम यांच्यापैकी कोणीतरी पाटण्याला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. बिहार निवडणुकीत पुन्हा यश मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांनी फोनवरून नितीशकुमारांचं अभिनंदन केलं होतं. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close