आज बेळगाव बंद

February 9, 2010 11:52 AM0 commentsViews: 16

5 फेब्रुवारी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगाव बंद पुकारला आहे. सकाळी वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरात पोलीस सुरक्षेत रॅली काढली. शहरातील बससेवा बंद आहे. उत्तर कर्नाटकमध्ये बेळगाव शहर वगळता कन्नड वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन करत आहेत. 5 फेब्रुवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सीमा परिषदेत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी पोलिसांनी वेदिकेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच 5 कार्यकर्त्यांना अटक केली होती. याबद्दल सीमावासियांमधून संताप व्यक्त होत आहे.

close